शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

माणदेशातील मेंढपाळांची वणवण; मुक्काम पोस्ट ‘आज हे गाव, उद्या ते गाव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 06:19 IST

दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत.

- नितीन काळेलसातारा : दुष्काळ हा माणदेशाच्या पाचवीला पूजलेला आहे. माण तालुक्यातील अनेक गावे आज दुष्काळाने कोलमडली आहेत. गावातील तरुणांनी कामासाठी, मेंढपाळ, शेतकऱ्यांनी जनावरे जगविण्यासाठी गावं सोडली आहेत. बनगरवाडीतील मेंढपाळांची तर आठ कुटुंबे दिवाळीपासून घोड्यावर संसार बांधून मराठवाड्यात आहेत. मेंढ्या जगविण्यासाठी रोज त्यांना नवे गाव शोधावे लागत आहे.माण तालुक्यात बहुतांश लोकांचा उदरनिर्वाह शेती आहे. त्याचबरोबर या शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध, शेळी-मेंढीपालन व्यवसाय. आजही या तालुक्यातील अनेक गावांत मेंढीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. या व्यवसायावरच त्यांचा वर्षानुवर्षे उदरनिर्वाह चालतो. दरवर्षी जून महिन्यानंतर पाऊस झाला की सगळीकडे आबादी आबाद असते; पण एखाद्या वर्षी पावसाने डोळे वटारले की जनावरे जगविण्यासाठी घरदार सोडायची वेळ येते. या वर्षीच्या दुष्काळात माण तालुक्यातील अनेक शेतकरी, मेंढपाळ जनावरे, शेळ्या-मेंढ्या जगविण्यासाठी तालुकाच नव्हे तर जिल्हा सोडून गेले आहेत.माणमधील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) हे गाव. जेमतेम दोन हजार लोकसंख्या गावाची. या गावातील तरुणवर्ग पुण्या-मुंबईला नोकरीला. तर अनेकांचा मेंढीपालनाचा व्यवसाय. याच गावातील आठ कुटुंबे दुष्काळ पडल्याने गेल्यावर्षी दिवाळी झाल्यानंतर मेंढ्या जगविण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडली आहेत. पंढरपूर, बार्शी अशी गावे करत आज ही कुटुंबे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात आहेत. या बनगरवाडीतील अशोक बनगर, किसन बनगर, सदाशिव वाघमोडे, चंद्रकांत ढेरे, धर्मा दोलताडे, नेताजी बनगर, गणेश शिंगाडे आणि दत्तू काळे हे मेंढ्या जगविण्यासाठी बाहेर पडलेत. तसेच यांच्या घरातील माणसे मिळून १५ जण ५०० मेंढ्यासाठी झटत आहेत. चाºयाच्या शोधात सर्वांनाच दररोज नव्या गावात मुक्काम करावा लागतो. मग, ती जागा घाणीची असो किंवा काट्याकुट्यांची; पण जगायचं आणि जगवायचं हेच ठरवून घरातून बाहेर पडलेल्या या कुटुंबांना आता पाऊस पडेपर्यंत मराठवाड्यातच राहावं लागणार आहे.मोबाइल चार्जिंग करायला एक जणमेंढपाळ कुटुंबीय मराठवाड्यात असली तरी गावी मुलं, आई-वडील, नातेवाईक आहेत. त्यांच्याशी दोन-चार दिवसांतून संपर्क करावा लागतो. त्यासाठी काही जणांकडे मोबाइल आहे. हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी शेजारील गावात जावे लागते. सर्वांचेच मोबाइल एकाने न्यायचे व ते चार्ज करून आणायचे. तोपर्यंत इतरांना मेंढ्यांना पाणी पाजणे, वाघर लावणे, दळण, जळण गोळा करणे अशी कामे करावी लागतात. या कुटुंबाबरोबर ५०० मेंढ्या, ८ घोडी आणि ६ कुत्री आहेत. घोड्यावर कुटुंबाचा सारा संसार असतो.पाण्याचा भाग आणि जुंधळ्याची रानं म्हणून काळ्या रानात जातो. बार्शी, उस्मानाबाद, लातूरपतूर आम्ही जातू. बाभळीची झाडं असत्याती. त्याच्या शेंगा खाऊन जनावर (जित्राब) जगतं. या रानात मेंढरं जगावायची म्हणून लोकांच्या शिव्याबी खाव्या लागत्यात; पण जगायचं म्हणल्यावर राग धरून थोडाच चालतूया. आता पाऊस पडल्यावर गावाकडं. तवर काळ रानच आमचं घर.- अशोक बनगर, मेंढपाळ 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdroughtदुष्काळ