होळीचागाव येथे आज विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:11 IST2021-02-18T05:11:49+5:302021-02-18T05:11:49+5:30

पुसेसावळी : होळीचागाव ता. खटाव येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व ...

Various events today at Holichagaon | होळीचागाव येथे आज विविध कार्यक्रम

होळीचागाव येथे आज विविध कार्यक्रम

पुसेसावळी : होळीचागाव ता. खटाव येथे मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते व खासदार श्रीनिवास पाटील यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार, दि. १८ रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

यावेळी होळीचागाव ग्रामस्थांतर्फे बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांचा नागरी सत्कार होणार आहे. जिल्हा वार्षिक योजना २०१९-२०२० मधून मंजूर होऊन पूर्ण झालेल्या श्री सिद्धनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ओढ्यावर बांधलेल्या तीस लाख रुपयेच्या साकव पुलाचे उद्घाटन, आमदार स्थानिक विकास निधी सन २०१९-२०२० मधून बांधलेल्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन व डोंगरी विकास निधी २०२०- २१ मधून मंजूर झालेल्या प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पवार, प्रा. बंडा गोडसे, खटाव पंचायत समिती सभापती जयश्री कदम, खटाव पंचायत समिती माजी सभापती संदीप मांडवे, रेखा घार्गे, कल्‍पना मोरे, संतोष घार्गे, एस. पी. देशमुख उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Various events today at Holichagaon