शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात 'वंचित'च्या खेळीमुळे लढतीत वाढणार ट्विस्ट, माजी सैनिकाला दिली उमेदवारी 

By दीपक देशमुख | Updated: April 22, 2024 14:34 IST

कोणावर होणार परिणाम?

दीपक देशमुखसातारा : सातारा लोकसभेसाठी महायुतीतून खासदार उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूकडून छोट्या-मोठ्या नेत्यांना आणि गटांना आपलेसे करत ताकद वाढवण्याचा प्रयत्न होत असताना वंचितने आपला उमेदवार उभा केला आहे. २०१९ मध्ये ४६ हजार तर पोटनिवडणुकीला १७ हजार मते घेणारी वंचित बहुजन आघाडी यावेळी किती मते खाणार त्याचा परिणाम कोणावर होणार याची चर्चा आता सुरू झाली आहे.गेल्यावेळच्या निवडणुकीमध्ये वंचितच्या भूमिकेमुळे भाजपचे आठ ते नऊ अतिरिक्त खासदार निवडून आल्याचा दावा महाविकास आघाडीच्या वतीने केला जात आहे. त्यामुळे महायुतीच्या विरोधात जी मते जाऊ शकतात, त्यांचे विभाजन होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीत वंचितला सहभागी करून घेण्याचा प्रयत्नही करण्यात आला; परंतु वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा-वाटपाचे गणित न जुळल्याने वंचितने वेगळी भूमिका घेतली व निवडणुकीत राज्यात १९ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये सातारा लोकसभेचाही उमेदवार आहे. तसेच सातारा लोकसभेसाठी वंचितने निश्चित केलेली मारुती जानकर यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून सैनिक फेडरेशनच्या मागणीनुसार प्रशांत कदम या माजी सैनिकाला दिली आहे. जिल्ह्यात सुमारे ८० हजार आजी-माजी सैनिक आहेत. २०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराने ४६ हजार मते घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीतून लढणाऱ्या उदयनराजे भोसले यांचे मताधिक्य घटले होते;परंतु या निवडणुकीत उदयनराजे महायुतीत आहेत. यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचे वंचितमुळे विभाजन होईल, असा महायुतीच्या नेत्यांचा व्होरा आहे तर वंचितच्या उमेदवारामुळे परिणाम होणार नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून होत आहे. निवडणुकीचे घाेडा मैदान जवळ आले असून वंचितच्या उमेदवारामुळे नेमकी राजकीय गणिते कशी बदलतात हे निकालानंतरच समजणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी