शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राजाळे येथील वैभव भोईटे यांना लडाखमध्ये वीर मरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2023 15:00 IST

लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे (ता.फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे या जवानांस वीर मरण आले.

नसीर शिकलगार फलटण(प्रतिनिधी) - लडाखमध्ये लष्कराच्या वाहनास झालेल्या अपघातात राजाळे (ता.फलटण) येथील वैभव संपतराव भोईटे या जवानांस वीर मरण आले. सपूर्ण राजाळे आणि परिसरात शोककळा पसरली आहे, वैभव भोईटे यांचे पार्थिव उद्या दुपारी राजाळे येथे येईल शासकीय इतमानाने  त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

शनिवारी दिनांक १९ रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास दक्षिण लढाख मधील न्योमा जिल्ह्यातील कियारीजवळ लष्करी वाहनाचा अपघात होऊन नऊ जवान ठार झाले होते. लडाख कियारी जवळ सात किमी अतरावर ही घटना घडली. हे जवान गॅरीस हून लेहजवळच्या क्यारी शहराच्या दिशेने निघाले होते.

वैभव यांच्या पश्चात पोलीस पत्नी प्रणाली , मुलगी हिंदवी (वय वर्षे दिड वर्ष), आई बिबीताई , वडील संपतराव धोंडीबा भोईटे, दोन विवाहित बहिणी दोन चुलते मोहन भोईटे, विलास भोईटे (जेलर अधिकारी) असा परिवार आहे. या घटनेने राजाळे गावात शोक काळापासून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. 

लष्कराचा ट्रक दरीत कोसळला

 लडाखमधील दक्षिण भागात न्योमा येथील कियारी परिसरात शनिवारी लष्कराचा एक ट्रक  दरीत कोसळून झालेल्या अपघातात नऊ जवान शहीद तर एक जवान जखमी झाला. शहीद जवानांबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केले.

या नऊ शहीद जवानांमध्ये एका ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसरचाही समावेश आहे. लेह येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षक पी. डी. नित्या यांनी सांगितले की, या लष्करी ट्रकमधून १० जवान प्रवास करीत होते. हा ट्रक लेह येथून न्योमाला चालला होता. त्यावेळी चालकाचे नियंत्रण सुटून हा ट्रक दरीत कोसळला. ही दुर्घटना शनिवारी संध्याकाळी ४.४५ वाजता घडली.