शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:34+5:302021-06-17T04:26:34+5:30

सातारा : सद्य:परिस्थितीत परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे कोविशिल्डच्या पहिल्या लसीचा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे, ...

Vaccinate students who go out for education | शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस द्या

शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लस द्या

सातारा : सद्य:परिस्थितीत परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातारा येथे कोविशिल्डच्या पहिल्या लसीचा डोस उपलब्ध करून देण्यात आला आहे, मात्र हा निकष अन्यायकारक असून पुणे, मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यांत खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही या लसीचा पहिला डोस उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी पुणे येथे स्पर्धा परीक्षेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सातारा येथे शिक्षण उच्चशिक्षणाच्या पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक यासारख्या शहरांना शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देतात. विद्यालयीन, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच जेईई, नीट, बँकिंग, एअरफोर्स, सेट-नेट, इंजिनिअरिंग, डी. एड्‌, एमपीएससी, युपीएससी, नोकरभरतीसारख्या परीक्षांच्या खासगी क्लासेसला अनेक जण प्रवेश घेत असतात. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनी आपापल्या घरी परतले होते. आपल्या घरीच राहून ते ऑनलाईन अभ्यास करत असे. आता शहरे खुले झाले असून तेथील बहुतांश खासगी क्लासेस सुरू झाले आहेत. सध्या शासनानेही ५० टक्के उपस्थितीमध्ये शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. सातारा येथून खासगी क्लासेस घेण्यासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्यापूर्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कोविशिल्डच्या पहिल्या लसीचा डोस देण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Web Title: Vaccinate students who go out for education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.