शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचा उत्तम पाटील प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 11:59 IST

महिला गटात भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने ठरली अव्वल

सातारा : सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत कोल्हापूरच्या उत्तम पाटील (वय २४) याने २१ किलोमीटर अंतर १ तास १३ मिनिटे ३२ सेकंदांत पूर्ण करून पुरुष गटात प्रथम क्रमांक पटकविला; तर भंडाऱ्याच्या तेजस्विनी लांबकाने हिने १ तास २६ मिनिटे १८ सेकंदांत शर्यत पूर्ण करत महिला गटात अव्वल क्रमांक पटकविला.सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित जाणाऱ्या स्पर्धेचे हे १३ वे वर्ष आहे. या मॅरेथॉन स्पर्धेची सुरुवात पोलिस परेड ग्राउंड येथून सकाळी ६:३० वाजता झाली. खासदार उदयनराजे भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर धावपटू मार्गस्थ झाले. देशभरातील सुमारे आठ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.पोलिस परेड ग्राउंड येथून सुरू झालेली स्पर्धा पारंगे चौक, पोवई नाका, बोगदा, पॉवर हाऊस, यवतेश्वर घाटातून हॉटेल निवांत, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट व त्याच मार्गाने पोलिस परेड ग्राउंड येथे समाप्त झाली. स्पर्धेनंतर आयोजित कार्यक्रमात विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

स्पर्धेतील विजेतेपुरुष गट :प्रथम : उत्तम पाटील (कोल्हापूर)द्वितीय : आनंद गावकर (बेळगाव)तृतीय : प्रथमेश परामकर (बेळगाव)महिला गट :प्रथम : तेजस्विनी लांबकाने (भंडारा)द्वितीय : साक्षी जडयाल (चिपळूण)तृतीय : वैष्णवी मोरे (कऱ्हाड)

साताऱ्यात धावपटूंनी अनुभवला थरार, स्पर्धेत धावले आठ हजार धावपटूसर्वदूर पसरलेली धुक्याची दुलई, हिरव्यागार वनराईने बहरलेल्या डोंगररांगा, यवतेश्वर घाटातील नागमोडी वळणे अन् जितकी रोमहर्षक तितकीच खडतर मानली जाणारी ‘सातारा हिल हाफ मॅरथॉन स्पर्धा’ साताऱ्यात मोठ्या उत्साहात पार पडली. देशभरातील आठ हजार धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून थरार अनुभवला.२१ किलोमीटर अंतराच्या या स्पर्धा मार्गावर आठ ठिकाणी मदत केंद्रे उभारण्यात आली होती, तसेच ऑटोमटिक इलेक्ट्रिक डिफ्यब्युलेटरची (एईडी), कार्डियाक रुग्णवाहिकांचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धा पाहण्यासाठी सातारकरांनी मॅरेथाॅन मार्गावर गर्दी केली होती. आबालवृद्धांकडून टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोस्ताहन देण्यात आले. निसर्गाशी एकरूप करणारा मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग जितका राेमहर्षक होता, तितकाच तो खडतरही होता. तरीदेखील हा रोमांचकारी थरार अनुभवत देशभरातील आठ हजार धावपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. स्पर्धेच्या मार्गावर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

घोषणांनी संचारले चैतन्यछत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा देत तिरंगा ध्वज हातात घेऊन रनर्स धावत होते. धावताना स्पर्धकांमध्ये वेगळेच स्फुरण पाहावयास मिळाले. स्पर्धकांची केलेल्या आगळ्यावेगळ्या वेशभूषेमुळे यवतेश्वर घाट खुलून गेला. घाटातील निखळ झऱ्यातील पाणी तोंडावर मारून स्पर्धक पुढे जात होते. काही स्पर्धकांना घाटातील छोट्या धबधब्यासमवेत सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

स्वयंसेवक, ग्रामस्थांची स्वच्छता मोहीमधावपटूंसाठी पाणी, चिक्की, केळी आदींनी जागोजागी व्यवस्था करण्यात आली होती. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला कचरा संयोजकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गोळा करून परिसराची स्वच्छता केली. ढोल-ताशांचा गजर, देशभक्तीपर गीते धावपटूंना प्रोत्साहन देत होते. संगीत गाणे, बँजोपथकाकडून स्पर्धकांचे स्वागतही करण्यात आले.

अहं योद्धा स्मि थीम!मी योद्धा आहे. जीवनात विविध अडचणी येत असतात. त्यांना सामोरे जात त्यावर मात करतो तोच विजयी होतो. या योद्धाला पाहून आपल्याला स्फुरण येते, असा संदेश या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. मॅरेथॉन मार्गावर स्पर्धकांसाठी मदतकेंद्रे उभारण्यात आली होती. गीते बिल्डिंग, यादोगोपाळ पेठ, बोगदा, यवतेश्वर घाट, साईबाबा मंदिर, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टच्या अलीकडे तसेच अदालत वाडा येथे ही मतदकेंद्र उभारली होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर