प्लास्टिकचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:11+5:302021-06-23T04:25:11+5:30
कऱ्हाड : शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशवी वापराला पालिकेने बंदी घातली असूनही सर्रास अनेक ठिकाणी छुप्या ...

प्लास्टिकचा वापर
कऱ्हाड : शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशवी वापराला पालिकेने बंदी घातली असूनही सर्रास अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने पिशव्यांचा वापर केला जात आहे. संबंधितांवर पालिकेने कारवाई करणे गरजेचे
आहे. कारवाईत सातत्य नसल्याने प्लास्टिकचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे.
कचऱ्याचे ढीग
कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे.
विहीर धोकादायक
कऱ्हाड : किरपे ते येणके रस्त्यावर व येणके हद्दीत असलेली विहीर धोकादायक ठरत आहे. रस्त्याकडेला काढण्यात आलेल्या या विहिराला संरक्षक कठडेही बांधण्यात आलेले नाहीत. याशिवाय कोणत्याही सूचनांचे फलक लावले गेले नाहीत. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे. येथे उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर कचरा
कऱ्हाड : पाटण तिकाटणे पसिरात नागरिकांकडून मोठ्या रस्त्याकडेलाच मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. तो हळूहळू रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित साफसफाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.