बांधकाम कामगार महासंघ फलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:40 IST2021-04-16T04:40:13+5:302021-04-16T04:40:13+5:30
खटाव : बांधकाम कामगार महासंघाच्या खटाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खटाव परिसरातील नोंदणीकृत कामगारांची बैठक उत्साहात झाली. यावेळी ...

बांधकाम कामगार महासंघ फलकाचे अनावरण
खटाव : बांधकाम कामगार महासंघाच्या खटाव तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खटाव परिसरातील नोंदणीकृत कामगारांची बैठक उत्साहात झाली. यावेळी फलकाचे अनावरणही करण्यात आले.
या बैठकीसाठी बांधकाम कामगार महासंघ सातारा जिल्हा संलग्न भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष शामराव गोळे, चिटणीस सुरेंद्र बोरकर, उपाध्यक्ष डी. जी. देशपांडे, विनोद केंजळे, जयवंत पवार, कृष्णात महामुनी, नीता सपकाळ तसेच खटाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
कामगार संघटना देशभरात सर्व उद्योगात प्रथम क्रमांकावर आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी बोर्ड स्थापनेपासून विविध प्रकारच्या ३० शासकीय योजना या कामगारांना मिळवून देण्यात सिंहांचा वाटा या संघटनेचा आहे, अशी माहिती संघटनेचे खटाव तालुका प्रतिनिधी विशाल पवार व वहिद खान यांनी दिली.
दरम्यान, खटाव येथे संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी आकाश शिंदे, हर्षल दोशी, संकेत देशमुख, विशाल देशमुख, नवनाथ शिंदे, धनाजी भोसले, उत्तम करळे, राजेश चव्हाण, गणेश कर्णे, अनिल लावंड, समीर मुजावर, मधुकर जाधव, आदी उपस्थित होते.
.......................................................................................................