बिनविरोध सदस्यांनी घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:28+5:302021-01-15T04:32:28+5:30

पाटण तालुक्यात १०७ व मतदारसंघातील सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये १२ अशा एकूण ११९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पाटण मतदारसंघाचे ...

Unopposed members met the Minister of State for Home Affairs | बिनविरोध सदस्यांनी घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

बिनविरोध सदस्यांनी घेतली गृहराज्यमंत्र्यांची भेट

पाटण तालुक्यात १०७ व मतदारसंघातील सुपने-तांबवे पंचायत समिती गणामध्ये १२ अशा एकूण ११९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पाटण मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे राज्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारसंघात अर्ज माघार घेण्याच्या दिवशीच ३६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामध्ये २१ ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे वर्चस्व आहे. अंशत: बिनविरोध झालेल्या ५० ग्रामपंचायतींमध्ये १२ ठिकाणी शिवसेना व मंत्री शंभूराज देसाई यांचे बहुमत असून ३८ ग्रामपंचायतींमध्ये सरळ लढत होत आहे तर अनेक ग्रामपंचायतींमध्ये समसमान सदस्य बिनविरोध झाले आहेत. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंची भेट घेतली. या सदस्यांचा गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

फोटो : १४केआरडी०३

कॅप्शन : पाटण विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची दौलतनगर येथे भेट घेतली.

Web Title: Unopposed members met the Minister of State for Home Affairs