नागठाणेत विनापरवाना दारूविक्री; एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST2021-07-04T04:26:06+5:302021-07-04T04:26:06+5:30

नागठाणे : बोरगाव पोलिसांनी नागठाणेत एका विनापरवाना विदेशी दारू विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. अविनाश अरविंद साळुंखे (वय ४५) असे ...

Unlicensed sale of liquor in Nagthane; Crime on one | नागठाणेत विनापरवाना दारूविक्री; एकावर गुन्हा

नागठाणेत विनापरवाना दारूविक्री; एकावर गुन्हा

नागठाणे : बोरगाव पोलिसांनी नागठाणेत एका विनापरवाना विदेशी दारू विकणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली. अविनाश अरविंद साळुंखे (वय ४५) असे व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून ५३ हजार ३६० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, १ जुलै रोजी दुपारच्या सुमारास बोरगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांना संबंधित व्यक्ती नागठाणे येथील नर्मदा गणेश आर्ट्स येथे दुचाकीवरून विदेशी दारू घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी पो. कॉ. राहुल भोये, मनोहर सुर्वे, विशाल जाधव, उत्तम गायकवाड यांना या ठिकाणी कारवाई करण्याचा सूचना केल्या.

संबंधित व्यक्तीकडे विदेशी दारूच्या ९६ बाटल्या आढळून आल्या. याबाबत त्यास दारूचा बाळगण्याचा तसेच विक्रीच्या परवान्याविषयी विचारले असता त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे समजले. त्यावेळी दुचाकीसोबतच सर्व दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

Web Title: Unlicensed sale of liquor in Nagthane; Crime on one