शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 13:02 IST

पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित मालट्रक पसार झाला.

ठळक मुद्देशिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडकमलकापुरातील घटना : आठ प्रवासी किरकोळ जखमी

मलकापूर : पुण्याहून मालवणकडे जात असलेल्या शिवशाही बसची अज्ञात मालट्रकला पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात आठ प्रवासी किरकोळ जखामी झाले. पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर रविवारी मध्यरात्री सव्वादोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर संबंधित मालट्रक पसार झाला.अपघातस्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बसचालक दयासागर मारुती गोने (रा. कसबा वाळवे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर ) हे बस (एमएच ०४ एचवाय ५२६३) रविवारी रात्री पुण्याहून प्रवासी घेऊन मालवणकडे जात होते. बस मध्यरात्रीनंतर सव्वादोन वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर महामार्गावर येथील अक्षता मंगल कार्यालयासमोर आली असता बसवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कोल्हापूर दिशेने निघालेल्या अज्ञात मालट्रकला पाठीमागून जोरदार धडक झाली.

धडक एवढी जोरात होती की बसच्या क्लिनर बाजूचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात प्रवासी झोपेत असल्यामुळे आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघात होताच मालट्रक चालक ट्रकसह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे कर्मचारी दस्तगीर आगा, रमेश खुने, अमित पवार घटनास्थळी दाखल झाले.

जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. जखमींना किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आले. अपघातग्रस्त बस महामार्गावरून बाजूला करून महामार्ग वाहतुकीस खुला केला. अपघाताची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

टॅग्स :ShivshahiशिवशाहीSatara areaसातारा परिसरAccidentअपघात