शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत थांबे दोन दिवसच

By admin | Updated: December 5, 2014 23:20 IST

राष्ट्रीय महामार्ग : प्रवासी पुन्हा रस्त्यावरच ; प्राधिकरणचा वेळकाढूपणा

शरद ननावरे - खंडाळा : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट, बोगदा परिसर ते केसुर्डी फाटा या टप्प्यात होणाऱ्या वारंवार अपघातामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यानंतर रस्ता रुंदीकरण करण्यापूर्वी आवश्यक सुविधा पुरविण्याबात स्थानिकांनी अनेकदा मागणी केली. मात्र, एखादी घटना घडल्यानंतर हायवे प्राधिकरण तात्पुरते जागे होते व काही काळाने विसरूनही जाते.
गत आठवड्यात खंडाळा येथे झालेल्या भीषण अपघातानंतर महामार्गावरील अनाधिकृत बस थांबे बंद करून सर्व प्रवासी बसेस खंडाळा बसस्थानकाकडे वळविण्यात आल्या होत्या. मात्र, हे चित्र फक्त दोनच दिवस पाहायला मिळाले. बसेसची सोय होत नसल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच थांबावे लागत आहे.
महामार्ग प्राधिकरणाचा वेळकाढूपणा व एस. टी. महामंडळाचा हलगर्जीपणा यामुळे प्रवासी मात्र जीव मुठीत धरूनच थांबलेले आजही पाहायला मिळतात. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडणार तरी केव्हा ? असाच प्रश्न स्थानिक जनतेतून विचारला जातोय. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणारी अशास्त्रीय वळणे, संरक्षक कठड्यांचा अभाव, क्वचितच दिसणारे सूचना फलक आणि अनेक सुविधांचा अभाव यामुळे या ठिकाणी महामार्ग ‘मृत्यूचा महामार्ग’ बनला आहे. त्यातच खंडाळा येथील उड्डाणपुलाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताने निष्पापांचे बळी गेले. त्यानंतर येथील बसथांबा बंद करून प्रवाशांना बसस्थानकात जाण्यास प्रवृत्त केले गेले. महामार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या खंडाळा बसस्थानकात वळविण्यात आल्या; पण हा कामदेखलेपणा केवळ चार दिवसच पहायला मिळाला. त्यानंतर मात्र येरे माझ्या मागच्या अशीच परिस्थिती आहे. स्थानकाकडे बस न थांबल्याने प्रवाशांना पुन्हा महामार्गावरच उभे राहण्याशिवाय गत्यंतर नाही. फक्त पहिल्या थांब्याच्या जागेऐवजी शंभर फूट पढे थांबा केला गेलाय म्हणजे इथले मरणे तिथे एवढाच काय तो बदल म्हणायला हवे. लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्राधिकरणाचा हा खेळ थांबणार तरी कधी हा यक्ष प्रश्न आहे.
वास्तविक महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या आराखड्ड्यात गावानजीक कोणत्या सुविधा द्याव्यात, याबाबत सूचना केल्या आहेत. मात्र, यापैकी सेवा रस्ते, बसथांबे, स्ट्रीट लाईट, भुयारी मार्ग यांची कुठलीही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. याबाबत हायवे अधिकाऱ्यांना जाब विचारला असता करतो म्हणण्यापलीकडे आजतागायत काही केले नाही. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये नाराजीचा सूर आहे.
खरं तरं या महामार्गावरून राज्यातील सर्वच भागातून तसेच गोवा, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ, छत्तीसगड आदी राज्यातीलही वाहतूक होत असते. त्यामुळे महामार्गावरील असुविधांचा फटका सर्वांनाच बसतोय. केंद्र शासनाने याकडे लक्ष देऊन राज्याला सूचना कराव्यात, अशीही अपेक्षा व्यक्त केली जातेय. मात्र सध्यातरी प्राधिकरण आणि ठेकेदारांच्या सावळ्या गोंधळामुळे आणि महामार्गावरील असुविधांमुळे लोकांचा नाहक जीव जात असतो. त्यामुळे या ठिकाणी निर्माण करावयाच्या सेवा-सुविधा या सर्वांसाठीच उपयोगी व संरक्षक ठरणार आहेत; परंतु हायवे रुंदीकरणासाठी स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बदल करायचा म्हटलं की केंद्रशासनाची परवानगी नसल्याचे कारण प्राधिकरण अधिकारी पुढे करून टोलवाटोलवी करीत असतात. मात्र हायवेच्या सेवा रस्त्यांच्या सुविधा प्रथम निर्माण करा त्यानंतरच सहा पदरीकरणाचे काम सुरू करा, अशी भूमिका तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी घेतली आहे.


काय आहे महामार्गाच्या आराखड्यात
सेवारस्ते रुंदी ७ मीटर
गावापासून किमान ३ कि. मी. चे सेवा रस्ते
सेवारस्त्यांच्या बाजूने फूटपाथ
५ फूटाचे
सेवा रस्त्यांवर दिशादर्शक फलक व स्ट्रीटलाईट
ट्रक बे व बस बे- शौचालय, ाुतारी व पाण्याच्या सुविधेसह
खंडाळा उड्डाण पुलाची रुंदी व उंची वाढविणे
भुयारी मार्ग योग्य जागी व स्वच्छतेसह वापरास योग्य
महामार्गाची देखभाल



खंबाटकी बोगदा ते केसुर्डी फाटा या रस्त्यावरच्या सुविधांबाबत व करावयाच्या बदलाबाबत महामार्ग प्रशासनाला अनेकदा मागणीचे निवेदन दिले, बैठका झाल्या, मात्र, अद्यापही कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. वास्तविक सहापदरीकरणाच्या करारामध्येच काही त्रुटी आहेत त्यात बदल करणे आवश्यक आहे.
- अनिरुध्द गाढवे, सदस्य पंचायत समिती, खंडाळा