शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 16:45 IST

‘राजें’ची नाराजी गुलदस्त्यात, उदयनराजे यांच्यावर तयार करण्यात आलेल्या एका खास गीताचे लोकार्पणावेळी राजेंनी ‘कॉलर’ उडवत दिल्या शुभेच्छा

छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी सातारा : ऐतिहासिक सातारा नगरीत तब्बल ३२ वर्षांनंतर भरलेल्या साहित्य संमेलनाने एक नवा इतिहास रचला. साहित्याचा हा सोहळा एकीकडे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत असतानाच, दुसरीकडे या सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. साहित्याच्या या दरबारात ‘राजें’ची भेट न झाल्याने राज्यभरातून आलेल्या हजारो चाहत्यांची आणि साहित्यिकांची मात्र निराशा झाली.सातारा येथील ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि ज्येष्ठ लेखिका डॉ. तारा भवाळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सोहळा झाला. वैचारिक परिसंवाद, कविसंमेलने आणि सांस्कृतिक मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी गेल्या चार दिवसांत लाखो साहित्यप्रेमींनी संमेलनात हजेरी लावली. साता-यातील संमेलनाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला.संमेलनातील या उत्साहाने अवघी शाहूनगरी न्हाऊन निघाली असली, तरी सातारच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरील सर्वात मोठे नाव असलेले खासदार उदयनराजे भोसले मात्र या व्यासपीठावर कोठेही दिसले नाहीत, याची खंत मात्र महाराष्ट्र व देशभरातून येणा-या साहित्यिकांनी व्यक्त केली.उदयनराजे यांचा केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यामध्ये प्रचंड चाहता वर्ग आहे. राजकीय क्षेत्रापलीकडे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक त्यांना भेटण्यासाठी नेहमीच आतुरलेले असतात. साताऱ्यात आल्यानंतर राजेंची भेट होईल, त्यांच्याशी हितगुज करता येईल, अशी मोठी अपेक्षा बाहेरून आलेल्या अनेक साहित्यिकांनी आणि लेखकांनी व्यक्त केली. मात्र, चार दिवस उलटले तरी उदयनराजे संमेलनाकडे फिरकले नाहीत, ज्यामुळे हजारो साहित्य रसिकांनी आपली खंत उघडपणे बोलून दाखवली.‘राजें’ची नाराजी गुलदस्त्यात ...राजे या संमेलनात सहभागी झाले असते, तर अनेकांचे त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले असते आणि संमेलनाला एक वेगळीच उंची लाभली असती, अशा भावना संमेलनस्थळी उमटत होत्या. उदयनराजे नेमके का आले नाहीत? त्यांच्या नाराजी मागील कारणे मात्र गुलदस्त्यात आहेत.

उदयनराजेंच्या ‘त्या’ शैलीची पुन्हा झलक...संमेलनस्थळी राजे दिसले नसले तरी, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक सुशील मोझर यांच्या माध्यमातून उदयनराजे यांच्यावर तयार करण्यात आलेल्या एका खास गीताचे लोकार्पण रविवारी ‘जलमंदिर’ या निवासस्थानी पार पडले. यावेळी राजेंनी आपल्या नेहमीच्या अनोख्या शैलीत ‘कॉलर’ उडवत या गाण्याला शुभेच्छा दिल्या. मात्र, संमेलनस्थळाकडे ते फिरकले नाहीत. त्यांची उणीव भासत असताना जलमंदिरवरील त्यांच्या या स्टाईलचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने जोरदार रंगली.

English
हिंदी सारांश
Web Title : Udayanraje Bhosle's absence felt at Marathi Sahitya Sammelan, fans express disappointment.

Web Summary : Udayanraje Bhosle's absence at the Marathi Sahitya Sammelan in Satara disappointed fans and literary enthusiasts. Despite a song launch at his residence, his non-attendance was conspicuous, sparking discussions about his reasons and unmet expectations.