उदयनराजे अन् भाजपाची छुपी युती
By Admin | Updated: February 14, 2017 00:53 IST2017-02-14T00:53:28+5:302017-02-14T00:53:28+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाशी

उदयनराजे अन् भाजपाची छुपी युती
सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाशी केलेली छुपी युती सोमवारी उघड झाली. जिल्हा परिषदेच्या गोडोली, वनवासवाडी, नागठाणे या गटांत, तसेच पाटखळ, खेड, वनवासवाडी, शेंद्रे, अतीत, नागठाणे या गणांत त्यांनी साटेलोटे केले आहे.
सातारा तालुक्यात जिल्हा परिषदेचे १० व पंचायत समितीचे २० मतदारसंघ आहेत. सातारा तालुक्यात काँगे्रसने खा. उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीसोबत जाहीर युती केली. मात्र, ही युती करत असताना काँगे्रसचे चिन्ह सातारा तालुक्यातून हद्दपार केले. काँगे्रसचे उमेदवारही खासदार उदयनराजे यांनीच निवडले. राष्ट्रवादीला शह देण्यासाठी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणी केली होती. त्यातून ही आघाडी पुढे आली. (प्रतिनिधी)