प्रतापगडावरील भवानीमातेचे उदयनराजे यांनी घेतले दर्शन!
By सचिन काकडे | Updated: October 23, 2023 15:29 IST2023-10-23T15:29:33+5:302023-10-23T15:29:46+5:30
सातारा : पवित्र खंडेनवमीचे औचित्य साधून प्रतापगडनिवासिनी भवानी मातेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी दर्शन घेतले. यावेळी अभिषेक ...

प्रतापगडावरील भवानीमातेचे उदयनराजे यांनी घेतले दर्शन!
सातारा : पवित्र खंडेनवमीचे औचित्य साधून प्रतापगडनिवासिनी भवानी मातेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सोमवारी सकाळी दर्शन घेतले. यावेळी अभिषेक व होमहवन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रतापगडावर दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस भवानी मातेची भक्ती भावाने आराधना केली. खा. उदयनराजे भोसले दरवर्षी भवानी मातेच्या दर्शनाला गडावर येत असतात. सोमवारी सकाळी त्यांनी खंडेनवमीचे औचित्य साधून भवानी मातेचे दर्शन घेतले, तसेच प्रतापगड ग्रामस्थांशी संवादही साधला.
गडावरील पाण्याचा प्रश्न गंभीर असून येथील वाहनतळाचा प्रश्न आजतागायत सुटलेला नाही. यासह प्रमुख समस्या ग्रामस्थांनी खा. उदयनराजे यांच्या पुढे मांडल्या. सर्व समस्यांचा आढावा घेत, दि. २५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी ग्रामस्थांना दिली.