शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:37 IST

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात सभापीठावर दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या.

ठळक मुद्दे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंची गळाभेट :सातारा जिल्ह्यात पुन्हा मनोमिलनाचे पर्वखोटारड्या अन् जुमलेखोरांना वेळीच हद्दपार करण्याचे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात आवाहन

सातारा : देशातील जनता फसवणुकीला कंटाळली आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वांची लबाडी मतदारांनी अनुभवली. अशा खोटारड्या आणि जुमलेखोरांना कायमस्वरूपी हद्दपार करा. सातारकर कायम राजघराण्याच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहेत यावेळीही हेच होईल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले.सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जावळी मतदार संघातील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते. सभापीठावर या मेळाव्यात दोन्ही राजेंनी इथून पुढच्या काळात मनोमिलन कायम करण्याच्या आणाभाका घेतल्या. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, नगराध्यक्ष माधवी कदम, सभापती मिलिंद कदम, वनिता गोरे, उपसभापती जितेंद्र सावंत, युवक अध्यक्ष तेजस शिंदे, ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.आमदार पाटील म्हणाले, साताऱ्यात दोन्ही राजेंच्या मनोमिलनमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. हे चैतन्य कायमस्वरूपी टिकवून ठेवण्याची जबाबदारी दोन्ही राजेंची आहे. कार्यकर्त्यांनी मनापासून परस्परांचे काम करून पुढे जावे.ह्णखासदार उदयनराजे म्हणाले, ह्यसाताऱ्याच्या विकासाठी आम्ही कटिबद्ध आहे. आमच्या विरोधकांनी आमच्यावर दहशत करत असल्याचा आक्षेप घेतला आहे, माझी दहशत प्रेमाची आणि आदराची आहे, हे त्यांच्यासारख्यांना समजणार नाही.उदयनराजे आणि मी निवडणुकीमुळे एकत्र आलेलो नाही, ऐतिहासिक सातारा जिल्ह्याच्या भल्यासाठी एकत्र आलो आहे. आपापसातील संघर्ष आम्ही नक्की सोडवू, कानाला लागून गैरसमज पसर्वणाऱ्यांचा आम्ही दोघेही बंदोबस्त करु, असा इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा विधानसभा मतदार संघात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.ते म्हणाले की, भूतकाळात अनेक कटू प्रसंग घडून गेले आहेत. ते प्रसंग उगाळीत न बसता आता सर्वांनी वाटचाल करायला हवी. संघर्ष टाळण्यासाठी साताऱ्याच्या भल्यासाठी एकत्र होणे गरजेचे होते. आमच्याकडून कुठलाही दगाफटका होणार नाही, याचा विश्वास बाळगा. माझे सख्खे मामा दादाराजे खर्डेकर लोकसभेला उभे असताना दिवंगत भाऊसाहेब महाराजांनी पक्षनिष्ठेसाठी माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे काम केले होते. मला पक्षनिष्ठा महत्वाची आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'केवळ साता?्याच्या विकासाच्या मुद्द्यावर हे मनोमिलन झाले आहे. यात कोणताही गोपनीय हेतू नाही. कार्यकर्त्यांनी एकदिलाने लोकसभेसाठी खासदार उदयनराजे यांचे काम करावे.यावेळी आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांनीही कार्यकर्त्यांना एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन केले. प्रारंभी सातारा जावलीच्या पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आघाडी धर्म पाळणे आणि मनोमिलन अबाधित राहण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी वसंतराव मानकुमरे, चंद्रकांत जाधव, आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसले