शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साताºयाच्या तरुणाची ‘यू-ट्यूबगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 23:26 IST

सातारा : काळजाचा थरकाप उडविणारा सह्याद्रीचा घाटमाथा अन् डोंगरदºया. थंड हवेचे महाबळेश्वर, पाचगणी असो वा स्वराज्याचे साक्षीदार ठरलेले अजिंक्यतारा, वासोटा, प्रतापगड. यांचा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले. यातील बहुतांश ठिकाणं जगभरातील पर्यटकांच्या मोबाईलवर अधिराज्य गाजवत आहेत. ही किमया घडली ती साताºयातील जीवन कदम यांच्या ‘यू-ट्यूबगिरी’मुळे.जीवन कदम यांचे मूळगाव कोरेगाव तालुक्यातील ...

सातारा : काळजाचा थरकाप उडविणारा सह्याद्रीचा घाटमाथा अन् डोंगरदºया. थंड हवेचे महाबळेश्वर, पाचगणी असो वा स्वराज्याचे साक्षीदार ठरलेले अजिंक्यतारा, वासोटा, प्रतापगड. यांचा जगभरातील पर्यटकांना नेहमीच आकर्षण राहिले. यातील बहुतांश ठिकाणं जगभरातील पर्यटकांच्या मोबाईलवर अधिराज्य गाजवत आहेत. ही किमया घडली ती साताºयातील जीवन कदम यांच्या ‘यू-ट्यूबगिरी’मुळे.जीवन कदम यांचे मूळगाव कोरेगाव तालुक्यातील चंचळी. त्यांचे शिक्षण साताºयातच झाले. आई अंगणवाडी शिक्षिकातर वडील मुंबईतल्या मिल बंद झाल्यामुळे गावाकडे येऊन वॉचमनचे काम करत. परिस्थितीशी झगडत जीवन कदम यांनी जिद्दीने संगणक क्षेत्रातील पदवी मिळविली. येथेच न थांबता पुढील उच्च शिक्षणासाठी मुंबई गाठली. कष्टाचं चीज झालं. नोकरी लागली. लग्न झालं; पण एवढ्यावर न थांबता इतरांपेक्षा वेगळं सिद्ध करण्याचा निर्णय घेतला. अन् येथूनच यू-ट्यूबसारखं प्रभावी माध्यम कामी आलं.‘जीवन कदम वलोग्स’ या मराठी यू-ट्यूब जगतातील नवीन पर्वाला सुरुवात झाली. निसर्गानं दहाही हातांनी दिलेली निसर्ग संपदा दिमतीला होती. यालाच भांडवल करत यू-ट्यूबसाठी लागणारा संगणक आणि कॅमेरा खरेदी केला. एकेदिवशी सर्वजण फिरायला तापोळा गेले. तेथे सहज चित्रीकरण केले. त्याला मराठी भाषेत आवाज दिला. चित्रीकरण यू-ट्यूबवर अपलोड केले अन् चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आत्मविश्वास वाढला अन् चित्रीकरणाची मालिका सुरू झाली ती थांबण्याचं नावच घेत नाही.हे सर्व करताना समजले की, अशा प्रकारे मराठीत व्हिडिओ ब्लॉगिंग दुसरे कोणीच बनवत नाहीत. महाराष्ट्रातील संस्कृती, सह्याद्रीच्या कुशीतील सौंदर्य आणि गड किल्ल्यांचा इतिहास या माध्यमातून जगभरात पोहोचवला तर ही छोटीशी सेवा घडू शकते.पाश्चिमात्य संगीताचा तडकालोकांना घरबसल्या राज्यातील ठिकाणांची तसेच गडांची माहितीपूर्ण भ्रमंती ही सिनेमॅटिक इफेक्टमध्ये. त्याला एक पाश्चिमात्य संगीताचा तडका दिला. यामुळे तरुणाईचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.यांचे झालेले चित्रीकरणवासोटाकासश्रमदान अन्नदात्यासाठी(पाणी फाउंडेशन)रानफुलं हरिश्चंद्र गड

टॅग्स :cultureसांस्कृतिक