साताऱ्यातील उरमोडी धरणात दोन तरुण बुडाले
By दत्ता यादव | Updated: May 28, 2023 23:43 IST2023-05-28T23:43:45+5:302023-05-28T23:43:59+5:30
रेस्क्यू टीमने तातडीने धरण परिसरात धाव घेतली. मात्र, अंधार असल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले.

साताऱ्यातील उरमोडी धरणात दोन तरुण बुडाले
सातारा : परळी, ता. सातारा येथील उरमोडी धरणात रविवारी सायंकाळी साताऱ्यातील दोन तरुण बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असनू, रात्री उशिरापर्यंत संबंधित तरुणांचा थांगपत्ता लागला नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, उरमोडी धरण परिसरामध्ये दोन तरुण फिरण्यासाठी गेले होते. सायंकाळी दोघेही उरमोडी धरणात पोहण्यासाठी उतरले. त्यावेळी पोहताना दम लागल्याने ते बुडाले. धरणाच्या काठावर दोन मोबाईल आणि दोन तरुणांचे कपडे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या प्रकाराची माहिती शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला मिळाली.
रेस्क्यू टीमने तातडीने धरण परिसरात धाव घेतली. मात्र, अंधार असल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. दरम्यान, धरणात बुडालेल्या तरुणांचा सोमवारी सकाळी शोध घेतला जाणार असल्याचे रेस्क्यू टीमचे चंद्रसेन पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. दोघेही तरुण साताऱ्यातील असून, त्यांची ओळख पटली नाही.