साताऱ्यात दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:47 IST2021-07-07T04:47:25+5:302021-07-07T04:47:25+5:30

सातारा : येथील राधिका रस्त्यावर असणाऱ्या भारत गॅस एजन्सीच्या समोरील पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात ...

Two-wheeler theft in Satara | साताऱ्यात दुचाकीची चोरी

साताऱ्यात दुचाकीची चोरी

सातारा : येथील राधिका रस्त्यावर असणाऱ्या भारत गॅस एजन्सीच्या समोरील पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सूर्यकांत भीमराव कांबळे (वय ३५, रा. सोनगाव, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी दि. २७ जून रोजी त्यांची दुचाकी (एमएच ११ - सीबी ९०७७) ही राधिका रस्त्यावरील भारत गॅस एजन्सीच्या समोरील रस्त्यावर पार्क केली होती. मात्र, सकाळी साडेआठ ते सव्वानऊ या वेळेत ती अज्ञाताने चोरून नेली. याबाबतची तक्रार त्यांनी रविवार, दि. ४ रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहायक फौजदार निकम हे करत आहेत.

Web Title: Two-wheeler theft in Satara