साताऱ्यातून दुचाकी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:39 IST2021-02-10T04:39:04+5:302021-02-10T04:39:04+5:30

सातारा : येथील मुख्य बसस्थानक परिसरातील काँग्रेस कमिटीसमोर उभा केलेल्या दुचाकीची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सातारा ...

Two-wheeler stolen from Satara | साताऱ्यातून दुचाकी चोरी

साताऱ्यातून दुचाकी चोरी

सातारा : येथील मुख्य बसस्थानक परिसरातील काँग्रेस कमिटीसमोर उभा केलेल्या दुचाकीची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खालीद मुहम्मद रफीक बारसकर (वय ३५, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसर त्यांनी आपली दुचाकी (एमएच ११, एएस. ०४७८) काँग्रेस कमिटीच्या आवारातील मोकळ्या जागेत उभा केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना तेथे दुचाकी आढळून आली नाही. तर परिसरातही दुचाकीचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यामुळे त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवालदार मोहिते हे तपास करीत आहेत.

.......................................

Web Title: Two-wheeler stolen from Satara