शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

ओव्हरटेकच्या प्रयत्नात दुचाकी घुसली एसटीखाली, दोघे गंभीर जखमी; मलकापुरातील पादचारी पुलाजवळ अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 11:59 IST

अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत

मलकापूर : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकी एसटीखाली घुसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील पादचारी पुलाजवळ सातारा मार्गिकेवर सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झाला. अपघातानंतर वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संचित रमेश कुदळे (वय २३), राहुल वसंत कुंभार (२४, दोघेही रा. ओंड ता. कऱ्हाड) अशी जखमींची नावे आहेत. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेढा आगाराची एसटी (एमएच ०७ सी ७१४३) ही नृसिंहवाडी येथून प्रवासी घेऊन सातारा-मेढा येथे जात होती. कऱ्हाड बसस्थानकात जाऊन सातारा दिशेने जात असताना येथील पादचारी पुलाजवळ सातारा यूटर्नवर आली असता ओंडकडे निघालेली दुचाकी (एमएच ११ एबी ४७१९) वरील युवकांनी एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नेमका सातारा यूटर्नवरच झाल्यामुळे दुचाकी एसटीच्या समोरील बाजूला एसटीखाली घुसली. या अपघातात दुचाकीवरील दोन्हीही युवक दुचाकीसह फरपटत गेल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी प्रशांत जाधव, धीरज चतुर यांच्यासह महामार्ग विभागाचे दस्तगीर आगा, जगनाथ थोरात, विवेक दुधात हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी युवकांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांचा पंचनामा करून वाहने ताब्यात घेतली आहेत. अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात