दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:26 IST2021-06-10T04:26:09+5:302021-06-10T04:26:09+5:30

आदर्की : आदर्की-काळज-सासवड रस्त्यावर लोढे वस्तीजवळ दोन दुचाकींची धडक होऊन एक जागीच ठार झाला, तर एक जखमी झाला. अजित ...

Two-wheeler collided head-on, killing one | दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार

दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार

आदर्की : आदर्की-काळज-सासवड रस्त्यावर लोढे वस्तीजवळ

दोन दुचाकींची धडक होऊन एक जागीच ठार

झाला, तर एक जखमी झाला. अजित हरिभाऊ पवार (वय ४२) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

अजित पवार व सूर्यकांत गणपत भोसले (३८, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) हे दोघे मंगळवारी (दि. ८) सायंकाळी सात वाजता मोटारसायकलीवरून काळज-हिंगणगाव रस्त्यावरून जात असताना सासवड (ता. फलटण) गावच्या हद्दीत लोंढे वस्तीजवळ सासवड बाजूने आलेेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत अजित पवार हे जागेवरच ठार झाले, तर पाठीमागे बसलेले सूर्यकांत भोसले जखमी झाला.

घटनेनंतर अज्ञात दुचाकीस्वाराने पलायन केले. त्यानंतर सूर्यकांत

भोसले याने अपघाताची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर मृतदेह

शवविच्छेदनासाठी फलटण येथे नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेहावर शेरेचीवाडी (ता. फलटण) येथे अत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, दोन लहान मुले आहेत.

फोटो -०९अजित पवार

Web Title: Two-wheeler collided head-on, killing one