शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

डॉक्टर व्हायचेय? देशात मेडिकलच्या दोन हजार चारशे जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 06:44 IST

महागडा आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर समजला जाणारा एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. देशात २२४ महाविद्यालयांत तब्बल २ हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत.

- प्रगती जाधव-पाटीललोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कोरोना महामारीमुळे परीक्षेत मुक्त हस्ते दिलेले गुण, ईअर ड्रॉपचा विद्यार्थ्यांनी घेतलेला निर्णय यासह परदेशात जाऊन अद्ययावत शिक्षण घेण्याची आस यामुळे यंदा एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमात २,४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्व जागांवर विनाडोनेशन प्रवेश देण्यात येणार असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना उत्तम करिअरची संधी मिळणार आहे.

महागडा आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेर समजला जाणारा एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रम सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. देशात २२४ महाविद्यालयांत तब्बल २ हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता निव्वळ शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतेच देशभरातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या रिक्त जागांबाबत माहिती प्रसारित केली आहे. महाराष्ट्रातील १९ महाविद्यालयांत बीडीएस आणि एमबीबीएसच्या ३३२ जागा अद्यापही रिक्त आहेत. यात एमबीबीएससाठी सांगली, मुंबई, कोल्हापूर, लोणी, कऱ्हाड, वर्धा, पुणे येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये एमबीबीएसच्या एनआरआय कोट्यामधील जागांचा समावेश सर्वाधिक आहे. यातील काही जागा एआयआयएमएस व जेआयपीएमईआरसारख्या केंद्रीय संस्थांमध्येही आहेत.

१. मर्सी फॅक्टर रिझल्टकोरोनाकाळात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवायला मर्यादा होत्या. परिणामी उत्तरपत्रिका तपासताना सढळ हाताने गुण देण्यात आले. यालाच शैक्षणिक क्षेत्रात मर्सी फॅक्टर रिझल्ट असे म्हणतात. या निकालामुळे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच अन्य शाखांमध्ये विद्यार्थ्यांना जाण्याची संधी उपलब्ध झाली. कोट्यवधी रुपये खर्च करून वैद्यकीय क्षेत्रापेक्षा अवकाश अभियांत्रिकीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असल्याचे दिसते.

२. परदेशात जाण्याकडे कल

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भारतात आठ वर्षे अभ्यास पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन पुन्हा लाखो रुपये खर्च करून दोन वर्षे अभ्यास करावा लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता यंदा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ईअर ड्रॉप घेऊन उत्तम गुण मिळवून परदेशात प्रवेश घेण्याची तयारी दर्शविली आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टर