शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गवडीतील दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू, मित्रांसोबत गेले होते पोहायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 22:57 IST

हे दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे...

सातारा : गवडी, ता. सातारा येथे पोहायला गेलेल्या दोन चिमुकल्या शाळकरी मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

स्वराज सतीश घोरपडे (वय ११), सोहम संतोष घाडगे (वय १०, रा. गवडी, ता. सातारा) अशी तलावात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गवडीतील प्राथमिक शाळेत शिकत असलेली तीन मुले गावापासून एक किलोमीटरवर असलेल्या सारखळच्या तलावात पोहण्यासाठी गेली होती. स्वराज आणि सोहम हे दोघे तलावात उतरले. त्यांना पोहता येत नव्हते. अचानक दोघेही गटांगळ्या घेऊ लागले. तलावाच्या काठावर असलेल्या दुसऱ्या मित्राच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने आरडाओरड केली. मात्र, काही वेळातच दोघेही तलावात बुडाले. या प्रकारानंतर त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने गावात येऊन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर गवडीतील तसेच आजूबाजूच्या शेतात काम करत असलेल्या नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी तलावात उतरून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.

एकाच गावातील या दोघा चिमुकल्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गवडी परिसरासह सर्वत्र हळहळ व्यक्त आहे. दोघेही एकुलते एक होते. यामुळे त्यांच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेSatara areaसातारा परिसरSwimmingपोहणे