शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
4
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
5
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
6
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
7
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
8
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
9
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
10
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
11
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
12
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
13
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
14
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
15
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
16
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
17
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
18
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
19
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

जोशी विहीर येथे कार-दुचाकी अपघातात दोघेजण ठार

By नितीन काळेल | Published: April 18, 2024 9:56 PM

लोकमत न्यूज नेटवर्क  सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर, ता. वाई येथे कार-दुचाकीच्या अपघातात दोघेजण ठार झाले. हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील जोशी विहीर, ता. वाई येथे कार-दुचाकीच्या अपघातात दोघेजण ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडला. मृतातील एकजण सातारा येथील तर दुसरा सांगली जिल्ह्यातील आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अपघातात दुचाकीवरील मंदार रामचंद्र कोल्हटकर (वय ४४, रा. कोल्हटकर आळी सातारा), आणि धीरज बाळासो पाटील ( वय ३७, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) या दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोशी विहीरजवळ झाला. मृत दोघे दुचाकीवरून सातारा बाजूकडे येत होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की यामध्ये दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर दोघांनाही सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चाैकीत नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर