महाबळेश्वर: एकाच तक्रारदाराकडून १५ हजार व दीड हजाराची वेगवेगळी लाच घेताना महाबळेश्वर पंचायत समितीचा विस्तार अधिकारी व आपले सरकार केंद्रातील तालुका व्यवस्थापकाला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी सायंकाळी महाबळेश्वर पंचायत समितीमध्ये करण्यात आली.
विस्तार अधिकारी सुनील संभाजी पार्टे (वय ५०, रा. मूळ रा. मांघर, ता. महाबळेश्वर), ओंकार संतोष जाधव (वय २७, रा. चिखली, ता. महाबळेश्वर) अशी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहे.याबाबत अधिक माहिती अशी, सोईस्कर ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यासाठी बीडीओंकडे शिफारस करतो, त्यासाठी १० हजार रुपये द्यावे लागतील तसेच दरमहा प्रोटोकाॅल म्हणून ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विस्तार अधिकारी सुनील पार्टे याने तक्रारदाराकडे केली. तर सेवा केंद्रातील ओंकार जाधव याने त्याच तक्रारदाराकडे ग्रामपंचायतीचे दप्तर, जमा खर्च, कीर्द, ग्रामपंचायत विभागाच्या पोर्टलवर ऑनलाइन क्लोजिंगसाठी १ हजार ५०० रुपयांची लाच मागितली.या प्रकारानंतर संबंधित तक्रारदाराने साताऱ्यात येऊन लाचलुचपत विभागाकडे रितसर लेखी तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता दोघेही लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. महाबळेश्वर येथील पंचायत समिती परिसरात बुधवारी सायंकाळी लाचलुचपत विभागाने सापळा लावला. त्यावेळी विस्तार अधिकारी सुनील पार्टे याला १५ हजारांची लाच स्वीकारताना तर सेवा केंद्राचा तालुका व्यवस्थापक ओंकार जाधव याला दीड हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. महाबळेश्वर पंचायत समितीमधील दोन अधिकारी लाच घेताना आढळून आल्याने महाबळेश्वरमध्ये प्रचंड खळबळ उडाली. महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दोघांवरही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे, हवालदार नितीन गोगावले, नीलेश राजपुरे, नीलेश चव्हाण, अजयराज देशमुख आदींनी या कारवाईत भाग घेतला.
Web Summary : In Mahabaleshwar, an expansion officer and center manager were caught red-handed accepting bribes. The officer demanded money for a favorable recommendation, while the manager sought funds for official document processing. Both are booked under anti-corruption act.
Web Summary : महाबलेश्वर में, एक विस्तार अधिकारी और केंद्र प्रबंधक को रिश्वत लेते हुए रंगे हाथों पकड़ा गया। अधिकारी ने अनुकूल सिफारिश के लिए पैसे मांगे, जबकि प्रबंधक ने आधिकारिक दस्तावेज़ प्रसंस्करण के लिए धन मांगा। दोनों पर भ्रष्टाचार निरोधक अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है।