शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू, चिंचणीनजीक अपघात

By दत्ता यादव | Updated: October 28, 2022 18:47 IST

ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे काही अंतर हवेत उडून खाली पडले. तर त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली.

सातारा : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील चिंचणी गावाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. रघुनाथ दत्तात्रय चिकणे (वय ५६, रा. मेढा, ता. जावळी), भरत यदू शेलार (वय ४०, रा, काळोशी, ता. जावळी) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात आज, शुक्रवारी दुपारच्या सुमारास झाला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दत्तात्रय राजाराम देशमुख (रा. कोरेगाव) हे झायलो कारने कोरेगावला निघाले होते. त्यांच्या कारमध्ये त्यांची पत्नी हर्षदा, मुलगा वेदांत, मुलगी प्रियंका आणि सासू कमल कासुर्डे असे पाचजण होते. दत्तात्रय देशमुख हे कार चालवित होते. चिंचणी, ता. सातारा गावच्या हद्दीत ते आल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या कारची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चिकणे आणि शेलार काही अंतर हवेत उडून खाली पडले. तर त्यांची दुचाकी रस्त्यातून फरफटत नाल्यात पडली.दोघांच्याही डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे मोठ्याप्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. यातच दोघांचाही मृत्यू झाला. तसेच कारमधील चालक दत्तात्रय देशमुख आणि त्यांची दोन्ही मुले, पत्नी, सासू हे सुद्धा गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.जखमींना पुढील उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांची सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली असून, हवालदार मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू