CoronaVirus Satara : सातारा जिल्हा रुग्णालयात आणखी दोन व्हेंटिलेटर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:04 IST2021-05-06T13:00:42+5:302021-05-06T13:04:11+5:30
CoronaVirus Satara : साताऱ्यात कोविडचा वाढता कहर लक्षात घेता पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

CoronaVirus Satara : सातारा जिल्हा रुग्णालयात आणखी दोन व्हेंटिलेटर दाखल
सातारा : साताऱ्यात कोविडचा वाढता कहर लक्षात घेता पदवीधर आमदार अरुण लाड यांच्या स्वीय निधीतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दोन ऑक्सिजन कॉन्सेंट्रटर आणि व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. प्रत्येक जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना त्यांना ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, कोणताही रुग्ण उपचारांआभावी दगावू नये म्हणून त्या-त्या जिल्ह्यातील सर्व बाबींचा आढावा घेऊन आमदार अरुण लाड यांनी प्रत्येक जिल्ह्यातील शल्य चिकित्सकांशी चर्चा करून ही उपकरणे त्यांच्या स्वीय निधीतून मतदारसंघात उपलब्ध करून देत आहेत.
आपल्या स्वीय निधीतील एवढा निधी केवळ वैद्यकीय सुविधेसाठी देणारे हे पहिलेच पदवीधर आमदार आहेत. या त्यांच्या सुविधेमुळे प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा भक्कम होईल आणि सामन्यात नागरिकांनाही आपला जीव ऑक्सिजनअभावी गमवावा लागणार नाही.