शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोरेगावच्या दोघांकडून थायलंडमध्ये परदेशी तरुणीवर अत्याचार, सीसीटीव्ही फुटेजवरुन संशयितांची ओळख पटवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:25 IST

सातारा : मित्रांसमवेत थायलंड येथे फिरायला गेलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघांनी थायलंडमध्ये बीचवर एका परदेशी तरुणीवर अत्याचार केल्याची ...

सातारा : मित्रांसमवेत थायलंड येथे फिरायला गेलेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघांनी थायलंडमध्ये बीचवर एका परदेशी तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. विजय दादासाहेब घोरपडे (वय ४७, रा. चिलेवाडी, ता. कोरेगाव), राहुल बाळासाहेब भोईटे (४०, रा. तडवळे संमत वाघोली, ता. कोरेगाव) अशी संशयितांची नावे आहेत. हे दोघेही व्यावसायिक असून, थायलंड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.विजय आणि राहूल हे दोघे मित्रांसमवेत थायलंडमध्ये फिरण्यासाठी गेले होते. थायलंडमध्ये १४ मार्च रोजी लारिन बीचवर फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी परदेशी तरुणी तिच्या मित्रासोबत आली होती. ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित दोघांनी तिला बीचवरील एका खडकावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हे दोघेही कोह फांगन जिल्ह्यातील गाव क्रमांक १ मधील बंगल्यावर निघून गेले.

अत्याचार झाल्यानंतर परदेशी तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा तपास सुरू केला. कोह फांगन पोलिस स्टेशनच्या अधीक्षकांनी सुरुवातीला रीन बीचवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्ह्याच्या ठिकाणावरून पळून जाणाऱ्या दोन संशयित भारतीय पुरुषांची पोलिसांनी ओळख पटवली. १६ मार्चला पीडित तरुणी शुद्धीवर आली.

त्यावेळी पोलिसांनी दोघा संशयितांना परत चौकशीसाठी बोलावून घेतले. पीडित तरुणीने त्या दोघांची ओळख पटवली. हिंसेचा वापर करून पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी या दोघांना थायलंड पोलिसांनी अटक केली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे बँकॉक पोस्टने आल्या वृत्तात म्हटले आहे.

कोरेगाव तालुक्यातील संबंधित दोघांची नावे थायलंड येथील अत्याचार प्रकरणात समोर आली आहेत. याची माहिती सातारा जिल्हा पोलिस दलाला देण्यात आली आहे. - समीर शेख, पोलिस अधीक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरThailandथायलंडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस