शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेत दोघे ठार

By दीपक शिंदे | Updated: August 24, 2024 15:47 IST

शेरेवाडी येथील घटना : उपचारापूर्वीच जखमींचा मृत्यू

दहिवडी : आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. अनिकेत नितीन मगर (वय २६ ) व रणजित राजेंद्र मगर (वय ३२, रा. शेरेवाडी, ता. माण) अशी मृत तरुणांची नावे आहेत. हा अपघात शेरेवाडी (ता. माण) येथे शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार जयकुमार गोरे यांचा सद्या जनसंवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यात त्यांच्यासोबत तीन ते चार वाहनांचा ताफा असतो. शनिवारी सकाळी आमदार गोरे हे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली होती. याच सुमारास बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी येथील अनिकेत मगर व रणजित मगर हे आपल्या दुचाकीवरून बिदालकडे निघाले होते. आमदार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव कारने दुचाकीला उडवले. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीसह दुचाकीस्वार हवेत उडाले. यात दुचाकीचा चक्काचूर झाला तर दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. यात कारचेही मोठे नुकसान झाले. गंभीर दुचाकीस्वारांना तत्काळ दहिवडीतील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बिदाल-शेरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताची दहिवडी पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेAccidentअपघातDeathमृत्यू