वाठार स्टेशनला दुरंगी लढत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST2021-01-10T04:30:09+5:302021-01-10T04:30:09+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मोठी बाजारपेठ असलेल्या वाठार स्टेशन ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांत चुरशीची लढत ...

वाठार स्टेशनला दुरंगी लढत!
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात मोठी बाजारपेठ असलेल्या वाठार स्टेशन ग्रामपंचायत निवडणुकीत दोन गटांत चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूण पाच वॉर्डअंतर्गत १३ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीसाठी २७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. एकहाती सत्ता असलेल्या राष्ट्रवादीकडून २०१० च्या निवडणुकीत परिवर्तन गटाकडे सत्ता आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा राष्ट्रवादीच्या ताब्यात ग्रामपंचायत आली. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना या महविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांसमोर भाजपचे कडवे आव्हान असणार आहे. वाठार स्टेशनला पिण्याच्या पाण्याचा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून, या कामाचे दोन्ही गट श्रेय घेत असले तरी मतदार कोणाचे पारडे जड करणार, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. ही प्रतिष्ठेची निवडणूक असून, सर्व नेत्यांनी विजयासाठी कंबर कसली आहे. प्रतिष्ठा राखण्यासाठी सर्व नेते आपापली ताकद पणाला लावणार असल्याचे दिसून येत आहे.