शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

क्षेत्र माहुलीतील दोघे गुन्हेगार दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडिपार

By नितीन काळेल | Updated: August 30, 2024 19:09 IST

पोलिस अधीक्षकांची कारवाई : खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह गंभीर गुन्हे नावावर 

सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसह अन्य गंभीर गुन्हे नावावर दाखल असणाऱ्या क्षेत्र माहुलीतील दोघा गुन्हेगारांना संपूर्ण सातारा जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातीलही काही तालुक्यांतून दोन वर्षासाठी तडिपार करण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे.पोलिसांच्या माहितीनुसार टोळीप्रमुख जयदीप सचिन धनवडे (वय २२) आणि हर्षद संभाजी साळुंखे (२२, दोघेही रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) अशी तडिपार झालेल्यांची नावे आहेत. या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. संबंधितांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली. पण, त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. सातारा शहर तसेच परिसरात ते सातत्याने गुन्हे करत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक राहिला नाही. त्यामुळे या टोळीवर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी टोळीविरोधात दोन वर्षे तडीपारबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची चाैकशी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी केली.पोलिस अधीक्षक शेख यांच्यासमोर या तडिपारीबाबत सुनावणी झाली. त्यानंतर दोघांनाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, इंदापूर तालुके. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून तडिपारीबाबत आदेश काढण्यात आला आहे. यासाठी सरकार पक्षाच्यावतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदर प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, सातारा शहर ठाण्यातील दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला.

पावणे दोन वर्षांत १२७ जण तडिपार..पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी मागील पावणे दोन वर्षांत विविध गुन्ह्यांतील एकूण १२७ गुन्हेगारांना तडीपार केले आहे तसेच एकावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचीही कारवाईही करण्यात आली आहे. यापुढेही जिल्ह्यातील गुन्हेगारांविरोधात तडीपार, मोक्का, एमपीडीए यासारख्या कडक कारवाया करण्यात येतील, असेही जिल्हा पोलिस दलाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस