साताऱ्यात टेम्पोच्या धडकेत दाम्पत्यासह दोन मुले गंभीर

By Admin | Updated: July 7, 2017 13:07 IST2017-07-07T13:07:35+5:302017-07-07T13:07:35+5:30

दुचाकीवरून जात होते घरी

Two children with serious involvement in a tempo shock in Satara | साताऱ्यात टेम्पोच्या धडकेत दाम्पत्यासह दोन मुले गंभीर

साताऱ्यात टेम्पोच्या धडकेत दाम्पत्यासह दोन मुले गंभीर


आॅनलाईन लोकमत


सातारा, दि. ७: दुचाकीवरून घरी जात असताना दाम्पत्याला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्यासह त्यांची दोन मुले गंभीर जखमी झाली. हा अपघात गुरूवारी रात्री आठच्या सुमारास झाला असून जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमशे विठ्ठल आंबेकर (वय ३०, रा. चिंचळी ता. औसा जि. लातूर) हे गुरूवारी रात्री दुचाकीवरून पत्नी ज्योती, मुलगा सार्थक आणि मुलगी जयश्री असे चौघेजण साताऱ्याहून लिंबला निघाले होते. येथील लिंबखिंडजवळ पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील चौघेही हवेत उडून बाजुला फेकले गेले. त्यामुळे चौघेही अपघातात गंभीर जखमी झाले.

हा अपघात काही वाहन चालकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांची पीसीआर व्हॅन काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली. या व्हॅनने जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची अद्याप पोलिस ठाण्यात नोंद झाली

Web Title: Two children with serious involvement in a tempo shock in Satara