Two children murdered by father | बापाकडून पोटच्या दोन मुलांचा खून

बापाकडून पोटच्या दोन मुलांचा खून

ठळक मुद्देबापाकडून पोटच्या दोन मुलांचा खूनखेड शिवापूर टोलनाक्यावर बाप जेरबंद

शिरवळ : दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या व पत्नीबरोबर होणाऱ्या वारंवार भांडणाच्या कारणातून बापाने दोन पोटच्या मुलांचा गळा आवळून खून केल्याची खळबजनक घटना शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे.

गौरवी चंद्रकांत मोहिते (वय ११) व प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय 7 दोघे सध्या रा.घाटकोपर,मुंबई,मूळ रा.रासाटी,कोयनानगर,सातारा जिल्हा) असे खून झालेल्या मुलांची नावे आहे. चंद्रकांत मोहिते हा आपल्या दोन मुलांना घेऊन मंगळवारी शिरूर परिसरात आला होता. त्याने गाडीतच मुलांचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे

याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी राजगड पोलीसांच्या सहकार्याने चंद्रकांत अशोक मोहिते (वय 37) याला मोठ्या शिताफीने खेड शिवापूर टोलनाक्यावर जेरबंद केले आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक उमेश हजारे,पोलीस हवालदार आप्पा कोलवडकर हे करीत आहे.

Web Title: Two children murdered by father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.