भीषण अपघात! फलटणमध्ये दोन कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 23:24 IST2022-05-03T23:24:35+5:302022-05-03T23:24:54+5:30
फलटण तालुक्यातील सुरवडी येथे भीषण अपघात; जखमींवर फलटण शहरात उपचार सुरू

भीषण अपघात! फलटणमध्ये दोन कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, ११ गंभीर जखमी
फलटण: फलटण तालुक्यातील मौजे सुरवडी येथील फलटण- लोणंद महामार्गावर जगताप वस्ती नजीक भीषण अपघातात 2 जण जागीच ठार तर 11 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याबाबात घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की फलटण- लोणंद रोडवर जगताप वस्ती नजीक इंडिका कार एम. एच.14 एफ. सी. 1104 व तवेरा गाडी क्रमांक एम. एच 14 बी. ए. 5053 या गाडीचा समोरा समोर भीषण असा गंभीर स्वरूपाचा अपघात झाला आहे. अज्ञात कोणत्यातरी कामानिमित्ताने पुणे येथे गेली होती.
पुणे येथून परत येताना फलटण तालुक्यातील सुरवडी येथील फलटण-लोणंद रोडवर जगताप वस्ती येथे भीषण अपघात झाला असून यातील गोट्या उर्फ सचिन भारत काळेल वय वर्षे 30 (रा. वळई, ता. माण, जि. सातारा) व शुभम केवटे वय वर्षे 28 (रा.संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) हे जागीच ठार झाले आहेत.
या अपघातात दैवत शामराव काळेल, वय- ३७, रा.वळई, ता. माण जि. सातारा), मल्लिकार्जुन विरलप्पा शिरगुंडे, ६३, रा.गुलबर्गा, देवरवस्ती, मायनगर), सुवर्णा मल्लिकार्जुन शिरगुंडे,५५ (रा.गुलबर्गा,देवरवस्ती,मायनगर), गंगाधर गुंडप्पा बेळंबगी, पोर्णिमा गंगाधर बेळंबगी, व त्यांची मुलं रचित व रचना पुजा अरुण कुमार पाटील (रा.नंदनवन सोसायटी हिंजवडी पुणे) व त्यांची दोन मुले अद्विक व प्रणम्या हे तवेरा गाडीतील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर फलटण शहरातील लाईफ लाईन व निकोप हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामधील काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.