साताऱ्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी
By नितीन काळेल | Updated: July 29, 2023 00:01 IST2023-07-29T00:01:25+5:302023-07-29T00:01:38+5:30
जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर

साताऱ्याजवळ दोन कारची समोरासमोर धडक; पाच जण जखमी
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर सर्व जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवार रात्री सव्वा नऊच्या सुमारास सातारा - कास रस्त्यावर यवतेश्वर घाटाजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. यामध्ये चार ते पाचजण जखमी झाले आहेत. या जखमींना वाहनातून बाहेर काढून सातारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर या अपघाताची माहिती मिळताच रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. सातारा तालुका पोलिस रात्री उशिरापर्यंत अपघातस्थळी होते. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली.