शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मायणीमध्ये दोन गाड्यांची समोरासमोर धडक, महिला ठार; तीघे जखमी, अपघातील सर्वजण सोलापुरातील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 13:45 IST

गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कऱ्हाड येथे दाखल करण्यात आले

मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग पक्षी राखीव संवर्धन क्षेत्राजवळ काल, गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या धडकेत एक महिला ठार, तर तिघे जखमी झाले आहेत. महानंदा मधुकर पवार (वय ५५, रा. मोहोळ, जि. सोलापूर) या जागीच ठार झाल्या, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.याबाबत मायणी पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती की, सह्याद्री कारखानाजवळ कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) या ठिकाणी राहत असलेल्या (मूळगाव मोहोळ जि. सोलापूर) येथील मधुकर पवार यांचे कुटुंब चारचाकी टमटम (एमएच ५० ए ३५९०) गाडीने मोहोळकडे निघाले होते. त्याचवेळी सदाशिवनगर माळशिरस येथून चारचाकी (एमएच १२ यूएफ ५८९५) या गाडीने सोपान माणिकराव देवकर येत होते. या दोन्ही चारचाकी वाहनांची मायणी राखीव पक्षी संवर्धन क्षेत्रच्या कार्यालयासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत महानंदा पवार या जागीच ठार झाल्या, तर सचिन मधुकर पवार, मधुकर बळीराम पवार (तिघेही, रा. मोहोळ, जिल्हा सोलापूर) गंभीर जखमी झाले, तर सोपान माणिकराव देवकर सदाशिवनगर (रा. माळशिरस) हे किरकोळ जखमी झाले आहेत.मधुकर पवार व मुलगा सचिन पवार हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कऱ्हाड येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी भेट दिली. पोलीस पाटील प्रशांत कोळी, पोलीस हवालदार नानासो कारंडे, सत्यवान खाडे, भूषण माने, अजित काळेल, अर्जुन खाडे, वनक्षेत्रपाल महादेव पाटील, वनरक्षक कुंडलिक मुंडे, वन कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी यांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात