विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST2021-06-20T04:25:57+5:302021-06-20T04:25:57+5:30
ओगलेवाडी : राजमाची, ता. कऱ्हाड येथील जानाई ओढ्यातून म्हशी घेऊन जात असताना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यामुळे झटका ...

विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू
ओगलेवाडी : राजमाची, ता. कऱ्हाड येथील जानाई ओढ्यातून म्हशी घेऊन जात असताना तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यामुळे झटका बसल्याने दोन म्हशी मृत्युमुखी पडल्या आहेत. यामध्ये मालकाचे सुमारे सव्वा लाख रुपये नुकसान झाले आहे. तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून येथील वीजपुरवठा खंडित केला आहे.
याबाबत माहिती अशी की, राजमाची, ता. कऱ्हाड येथील रहिवासी शेतकरी अशोक विठोबा पवार हे म्हशी चारण्यासाठी ओढ्यातून पलीकडे घेऊन जात होते. या ओढ्यावरून जाणारी वीजवाहक तारा तुटून पडली होती. याचा शाॅक लागून या दोन्ही म्हशीचा मृत्यू झाला. ही माहीत समजताच सरपंच व नागरिक ओढ्याकडे गेले. त्यांनी आणि माजी सरपंच दादा डुबल यांनी या घटनेची माहिती तलाठी व ओगलेवाडी वीज कार्यालयात कळवली. त्यांनी तातडीने तेथे पोहोचून विद्युत पुरवठा बंद केला. तलाठी यांनी घडलेल्या घटनेचा तत्काळ पंचनामा केला. संबंधित शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी माजी सरपंच दादासाहेब डुबल यांनी केली आहे.