दरोड्याच्या तयारीतील दोघांना पकडले; तलवार, रस्सी, चटणी सापडली...
By नितीन काळेल | Updated: February 23, 2024 21:27 IST2024-02-23T21:26:52+5:302024-02-23T21:27:23+5:30
साताऱ्यातील प्रकार; तिघेजण पसार; पोलिसांकडून शोध सुरू

दरोड्याच्या तयारीतील दोघांना पकडले; तलवार, रस्सी, चटणी सापडली...
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा शहरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तर इतर तिघेजण पसार झाले आहेत. संबंधितांकडून तलवार, दोरी, चटणी पूड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका गाडीतून काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राधिका रस्त्यावरील छत्रपती प्रतापसिंह शेती फार्ममध्ये गाडी अडवली. यावेळी गाडीतील दोघांना ताब्यात घेण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले.
तर तीन संशयित घटनास्थळावरून पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून दोन तलवारी, मिरची पूड, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर संशयित हे सातारा शहरातील असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तर इतर संशयितांचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे.