शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News Satara: बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 18:59 IST

बेलवडे हवेली येथील दोन युवकांकडे पिस्तूल असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती.

कऱ्हाड : चायना बनावटीचे पिस्तूल बेकायदेशीररीत्या बाळगल्याप्रकरणी दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. ही कारवाई बेलवडे हवेली, ता. कऱ्हाड येथे तळबीड पोलीस ठाण्याच्या पथकाने सोमवारी सायंकाळी केली. योगेश अंकुश पवार (वय ३७) व समाधान जालिंदर देशमुख (१९, दोघेही रा. बेलवडे हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. या आदेशानुसार तळबीड पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात तपास करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील, सहायक फौजदार सूर्यकांत देशमुख, पोलीस नाईक संदेश दीक्षित, कॉन्स्टेबल प्रवीण फडतरे, कॉन्स्टेबल नीलेश विभुते यांचे पथक कार्यरत आहे. विभागात तपास करीत असताना बेलवडे हवेली येथील दोन युवकांकडे पिस्तूल असल्याची माहिती या पथकाला मिळाली.त्यानुसार पथकाने माहितीची खातरजमा करून सोमवारी सायंकाळी गावात छापा टाकला. संबंधित दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चायना बनावटीचे पिस्तूल आढळून आले. संबंधित पिस्तुलाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. याबाबतची नोंद तळबीड पोलिसात झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील व सहायक फौजदार मुळीक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस