शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडात आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना अटक, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 12:18 IST

कऱ्हाड : ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ...

कऱ्हाड : ‘आयपीएल’चा सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सोमवारी ही कारवाई केली. आरोपींकडून या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून, साखळीच्या शोधासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना झाले आहे. या पथकाकडून मुंबईत ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासो कटरे (दोघेही रा. कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. कऱ्हाडात गत काही वर्षांपासून ‘आयपीएल’वर सट्टा लावला जात आहे. वेळोवेळी पोलिसांनी या सट्टेबाजांवर कारवाई केली आहे. मात्र, तरीही दरवर्षी ‘आयपीएल’ सुरू होताच शहरात सट्टा लावण्याचे प्रकार घडत आहेत.

अशातच गत काही दिवसांपासून शहरात काहीजण ‘आयपीएल’वर सट्टा लावत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस सट्टेबाजांचा शोध घेत होते. रविवारी याबाबतची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर सोमवारी पोलिसांनी दोन ठिकाणी छापे टाकून संदीप बडेकर व प्रथमेश कटरे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.सट्टेबाजारातील साखळीचा शोध घेण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. तसेच कोणाच्या वरदहस्ताखाली सट्टेबाजार चालविला जातो, याचीही माहिती पोलिस घेत आहेत. अटक केलेल्या आरोपींकडे पोलिसांकडून गोपनीयरीत्या तपास केला जात आहे. त्यांच्याकडून महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे तपासासाठी पोलिस पथक मुंबईला रवाना झाले असून, त्याठिकाणी छापासत्र सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काहीजणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. त्यामुळे गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीIPLआयपीएल २०२४Policeपोलिस