शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोरणा पठारावर वीस जनावरे दगावली

By admin | Updated: August 18, 2015 22:30 IST

बोटोलिझम रोगाचा विळखा : शेतकरी हवालदिल; उपाययोजनेची मागणी

पाटण : तालुक्याच्या मोरणा पठारावरील नागवणटके, भाकरमळी, हुंबरणे, आटोली, पांढरेपाणी या दुर्गम गावातील गाई, म्हशी यासारखी पाळीव जनावरे बोटोलिझम या संसर्गजन्य रोगामुळे दगावली जात असून आतापर्यंत सुमारे २० जनावरे दगावल्याच्या घटना येथील शेतकरी सांगत आहेत. हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी मोरगिरी पशु वैद्यकिय दवाखान्याचे कर्मचारी सतत प्रयत्नशिल असूनही रोगाचा जीवघेणा प्रवास सुरुच आहे.गेल्या तीन वर्षापूर्वी मोरणा पठारावर अशाच प्रकारच्या रोगाने थैमान घातले. त्यामुळे शेकडो पाळीव जनावरे मरुन गेली होती. मेलेल्या जनावरांची हाडे इतर पाळीव जनावरांनी चघळल्यामुळे हा रोग जडतो. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तर डोंगरावरील शेतकरी सांगतात की, गेल्या आठ दिवसांपासून आमच्या गायी म्हैसी पोट फुगून मरत आहेत. जनावराचा पाठीमागील भाग लुळा पडत असून एकाच जागेवर धडपडून त्यांचा मृत्यू होत आहे. भाकरमळी येथील दगडू शेळके यांच्या पाच गायी रोगाने मेल्या तर रामू विठू शेळके यांच्या चार गायी बळी पडल्याचे कोंडीबा शेळके यांनी सांगितले. (प्रतिनिधी)बोटोलिझम हा रोग पसरल्याचे मी पाटण पंचायत समितीच्या सभागृहात बोललो होतो. याचे गांभीर्य पशुवैद्यकीय विभागाला समजले नाही. त्यामुळे मोरणा परिसरातील पाळीव जनावरांचय मृत पावल्याच्या घटना सुरु झाल्या आहेत. याबाबत आता पशुवैद्यकीय विभागाने जिल्हास्तरीय पथक मोरणा पठारावर पाठवावे. अन्यथा जनावरे दगावल्याची नुकसान भरपाई संबंधित यंत्रणेला द्यावी लागेल. यासाठी आमदार शंभूराज देसार्इंच्या माध्यमातून पाठपुरावा करु. - नथुराम कुंभार, पंचायत समिती सदस्यढेबेवाडी विभागातील पाळशी, पाणेरी येथे पाळीव जनावरांना बोटोलिझमचा आजार सुरु झाला होता. त्यावेळेपासूनच माझ्या कार्यक्षेत्रातील पाळीव जनावरांना प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण सुरु केले होते. अजूनही पाळीव जनावरांना वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. - डी. बी. डोईफोडेसहाय्यक पशुधन वैद्यकीय अधिकारीमोरगिरी