‘आस्था’ने घेतले बारा विद्यार्थी दत्तक

By Admin | Updated: June 23, 2016 01:20 IST2016-06-22T23:53:39+5:302016-06-23T01:20:28+5:30

शिक्षणासाठी पुढाकार : संस्था करणार विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च

Twelve students adopted from 'faith' | ‘आस्था’ने घेतले बारा विद्यार्थी दत्तक

‘आस्था’ने घेतले बारा विद्यार्थी दत्तक

कऱ्हाड : येथील आस्था सामाजिक विकास सेवा संस्थेच्या वतीने मलकापूरच्या नामदार आनंदराव चव्हाण विद्यालयातील बारा विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहेत. पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यालयात नुकताच कार्यक्रम पार पडला.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पिसाळ, शेतीमित्र अशोकराव थोरात, मुख्याध्यापक पाटील, सचिन ढवळीकर, मंजिरी खुस्पे, मनीषा पिसाळ, अजित पानस्कर यांच्यासह मान्यवर, शिक्षक उपस्थित होते.
यावेळी आस्था संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पिसाळ म्हणाल्या, ‘आमची संस्था समाजातील गरजू तसेच विकासापासून वंचित घटकांना मदत करण्याच्या हेतूने सुरू करण्यात आली आहे. आर्थिक परिस्थितीमुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू
नये, या हेतूने १२ विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले आहे. त्यांचा सर्व शैक्षणिक खर्च संस्थेतर्फे करण्यात येणार आहे.’
यावेळी राजलक्ष्मी शिवणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या उपाध्यक्षा सोनल भोसेकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश शहा यांनी सूत्रसंचालन केले. जयंत पालकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Twelve students adopted from 'faith'