कऱ्हाड -पाटण मार्गावर मॉर्निंग वॉकवेळी ट्रकची धडक; पत्नी ठार, पती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 16:45 IST2017-11-11T16:37:31+5:302017-11-11T16:45:56+5:30

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. कऱ्हाड -पाटण मार्गावर गिरेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

The truck hits the morning walk on Karhad-Patan road; Wife killed, husband serious | कऱ्हाड -पाटण मार्गावर मॉर्निंग वॉकवेळी ट्रकची धडक; पत्नी ठार, पती गंभीर

कऱ्हाड -पाटण मार्गावर मॉर्निंग वॉकवेळी ट्रकची धडक; पत्नी ठार, पती गंभीर

ठळक मुद्देकऱ्हाड -पाटण मार्गावर गिरेवाडीत अपघातस्टेअरींगचा रॉड तुटल्याने दुर्घटनापतीवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू

मल्हारपेठ ,दि. ११ : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दाम्पत्याला ट्रकने धडक दिली. यामध्ये पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. कऱ्हाड -पाटण मार्गावर गिरेवाडी, ता. पाटण गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

संगीता राजाराम काळे (वय ४८) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती राजाराम किसन काळे (वय ५२, मुळ रा. सोनाईचीवाडी, सध्या रा. मल्हारपेठ, ता. पाटण) यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोनाईचीवाडी येथील राजाराम काळे यांचे मल्हारपेठ येथे ज्योतिर्लिंग हार्डवेअर नावाचे दुकान आहे. व्यवसायानिमित्त राजाराम काळे यांच्यासह त्यांचे कुटूंबिय मल्हारपेठ येथेच राहण्यास आहेत.

दररोज सकाळी राजाराम हे पत्नी संगीता यांच्यासोबत मॉर्निंग वॉकला जात होते. शनिवारी सकाळीही पती-पत्नी मॉर्निंग वॉकसाठी कऱ्हाड -पाटण मार्गावरून कऱ्हाडच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकच्या स्टेअरींगचा रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटून ट्रकची राजाराम व संगीता यांना धडक बसली. यामध्ये दोघेही जखमी झाले.

अपघात निदर्शनास येताच ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. जखमींना उपचारार्थ रूग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान संगीता यांचा मृत्यू झाला. तर राजाराम यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगीतले. अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलीस दुरक्षेत्रात झाली आहे.

Web Title: The truck hits the morning walk on Karhad-Patan road; Wife killed, husband serious