शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: खंडाळ्यात 'एस कॉर्नर'ला ब्रेकफेल ट्रकचा थरार.., महामार्गावर उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:23 IST

पहिलीच खेप अन् ट्रक पलटी

खंडाळा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील एस कॉर्नर परिसरात झालेल्या अपघातात ब्रेकफेल मालट्रकने समोरील वाहनाला धडक देऊन पुढे बेंगरूटवाडीच्या कच्चा रस्त्यावर जाऊन ट्रक पलटी झाला. क्षणार्धात घडलेल्या अपघाताच्या थराराने महामार्गावर खळबळ उडाली.यामध्ये घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार, दि. ५ रोजी साखर वाहतूक करणारा मालट्रक (एमएच १० सीआर ४१९७) हा सांगलीहून साखर भरून मुंबईला निघाला होता. दरम्यान, मालट्रक खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नर परिसरातील कॅनॉलजवळ आला असता ट्रकचा एअरपाइप फुटल्याने ब्रेक निकामी झाला.यामुळे चालक लखन भिवा दुधाळ (मु.पो. खवे, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकची समोर जाणाऱ्या चारचाकी (एमएच १४ डीएन १५९६) वाहनाला जोरदार धडक बसली व ट्रक पुढे जाऊन शेजारी असणाऱ्या बेंगरूटवाडीच्या कच्च्या रस्त्यावर जाऊन पलटी झाला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु चारचाकी वाहनातील एक महिला गंभीर जखमी झाली व दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच खंडाळाचे पोलिस अंमलदार प्रकाश फरांदे, संजय पोळ, संजय जाधव व शिरवळ रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद करण्याचे काम खंडाळा पोलिस स्टेशनला रात्री उशिरापर्यंत सुरू होते.पहिलीच खेप अन् ट्रक पलटीया अपघातामधील ट्रकचा चालक लखन दुधाळ हा बदली चालक म्हणून आला होता. आधीचा चालक कामानिमित्त सुट्टीवर असल्याने लखनला बोलवण्यात आले व पहिल्याच खेपेत ट्रक पलटी झाल्याने ट्रकचालक प्रचंड घाबरला होता.