तिहेरी अपघात तेरा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 19:31 IST2017-09-24T19:29:38+5:302017-09-24T19:31:29+5:30
सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वाठार स्टेशनजवळ रविवारी दुपारी एकच्या सुमारास दोन एसटी व जीप यांच्यात अपघात झाला. यात तिन्ही वाहनांच्या चालकांसह तेरा प्रवासी जखमी झाले.

तिहेरी अपघात तेरा जखमी
वाठार स्टेशन (सातारा) : सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वाठार स्टेशनजवळ रविवारी दुपारी एकच्या सुमारास दोन एसटी व जीप यांच्यात अपघात झाला. यात तिन्ही वाहनांच्या चालकांसह तेरा प्रवासी जखमी झाले.
याबाबत माहिती अशी की, सातारा बाजूकडून सातारा-नीरा (एमएच ०६ एस ८१८६) व सातारा-फलटण (एमएच १४ बीटी २८३४) या दोन एसटी गाड्या एका मागे लोणंद बाजूकडे निघाल्या होत्या. सातारा-नीरा या एसटीच्या पुढे जात असताना सातारा-फलटण या एसटीला लोणंदकडून येणारी जीप (एमएच १४ बीसी १२७१) ची समोरून धडकली.
याचवेळी या एसटीला सातारा-नीरा बसने पाठीमागून धडक दिली. यात तिन्ही वाहनांचे चालक तसेच एसटीमधील दहा प्रवासी जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालय, पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालय अणि वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.