कोपर्डे हवेली येथे युवकांकडून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:43 IST2021-07-14T04:43:57+5:302021-07-14T04:43:57+5:30

कोपर्डे हवेली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. तसेच युवकांचा ही सहभाग असतो. ...

Tree planting by youth at Koparde Haveli | कोपर्डे हवेली येथे युवकांकडून वृक्षारोपण

कोपर्डे हवेली येथे युवकांकडून वृक्षारोपण

कोपर्डे हवेली : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शासनाबरोबर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात येत असते. तसेच युवकांचा ही सहभाग असतो. कोपर्डे हवेली येथे पावकता येथील सिद्धनाथ मंदिर परिसरात युवकांनी वृक्षारोपण केले.

यावेळी राणी येसूबाई ग्रामीण बिगर सरकारी पतसंस्थेचे संचालक गुरुदत्त चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य अमित पाटील, युवराज चव्हाण, अक्षय चव्हाण, युवा संघटक शुभम चव्हाण, पंकज पाटील, अभिजीत जाधव, तेजस पाटील, अभिजीत चव्हाण, सचिन अर्जुगडे, सागर शिंदे, रवी साळवे यांचा सहभाग होता.

येथील युवकांच्या माध्यमातून पावसाळ्यात प्रत्येक वर्षी वृक्षारोपण करण्यात येत असते. दोन वर्षांपूर्वी महादेवाच्या डोंगरावर तसेच दत्त मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले होते.

कोट

निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतो. लावलेल्या रोपांचे संगोपन करत असतो.

- गुरुदत्त चव्हाण,

राणी येसूबाई ग्रामीण बिगर सरकारी संस्था कोपर्डे हवेली.

फोटो ओळ

कोपर्डे हवेली येथे युवकांनी वृक्षारोपण केले.

Web Title: Tree planting by youth at Koparde Haveli