विद्यानगरला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:45+5:302021-06-09T04:47:45+5:30
गत काही दशकांत त्यातील विविध घटकांची हानी करत आपण आलेलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल न राखण्याचा परिणाम दैनंदिन जीवनातही ...

विद्यानगरला पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
गत काही दशकांत त्यातील विविध घटकांची हानी करत आपण आलेलो आहोत. परंतु, पर्यावरणाचा समतोल न राखण्याचा परिणाम दैनंदिन जीवनातही जगभर दिसू लागलेला आहे. त्याबद्दल जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. फक्त झाडे लावा६ आणि झाडे जगवा हा नारा न देता झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे हेदेखील तितकेच गरजेचे आहे. आधार सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने अकरा रोपांची लागवड विद्यानगर व सैदापूर येथे संतोष माने, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनेश मेटकरी, संचालक शशिकांत पवार यांच्या हस्ते करण्यात आली.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त देशाची सध्या परिस्थिती पाहता निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत चाललेला दिसून येत आहे. त्यामुळे हे संतुलन सुरळीत करण्यासाठी वृक्षारोपणाची गरज आहे. कोरोनाचा काळ असल्याने सामाजिक अंतर ठेवून संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
फोटो : ०८केआरडी०१
कॅप्शन : विद्यानगर-कऱ्हाड येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. संतोष माने, प्रा. दिनेश मेटकरी, शशिकांत पवार उपस्थित होते.