संरक्षणासाठी चक्क रस्त्यात लावले झाड

By Admin | Updated: April 8, 2015 00:33 IST2015-04-07T20:18:24+5:302015-04-08T00:33:49+5:30

खड्डा ठरतोय कर्दनकाळ : वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी सदर बजार येथील नागरिकांचा पुढाकार; उपाययोजनेची मागणी

Tree planted in the road for protection | संरक्षणासाठी चक्क रस्त्यात लावले झाड

संरक्षणासाठी चक्क रस्त्यात लावले झाड

सातारा : नागरी सुविधांसाठी अनेकवेळा आंदोलने केली जातात. त्यामध्ये रास्ता रोको, मोर्चा, निदर्शन तर कधी रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारापोणही केले जाते. यामुळे अनेकदा आंदोलनकर्त्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. परंतु येथील समाजकल्याण कार्यालयाजवळ रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून सदर बजार येथील नागरिकांनी एकत्र येवून वाहनधारकांच्या संरक्षणासाठी या खड्ड्यात चक्क झाड उभे केले.सदर बजार येथील समाजकल्याण कार्यालयालगत गेल्या दोन महिन्यांपासून जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे नुकताच डांबरीकरण केलेला रस्ताही उखडला आहे. पाईपलाईनला लागलेल्या सततच्या गळतीमुुळे याठिकाणी रस्त्यावर सुमारे तीन फुुट व्यासाचा व दोन फुट खोलीचा खड्डा पडला आहे. दिवसभर या खड्ड्यातून हजारो लीटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे जागोजागी पाण्याची डबकी साचली आहेत. वाहत्या पाण्यामुळे डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता उघडण्याची शक्यता नाकारात येत नाही. दरम्यान जलवाहिनी फुटलेल्या खड्ड्यात दिवसभर पाणी साचून राहत असल्याने वाहनचालकांना या खड्ड्याचा अंदाज येत नाही. प्रामुुख्याने रात्रीच्या वेळी या खड्ड्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. नुकतेच मध्यरात्री एक महागडे चारचाकी वाहन या खड्ड्यात आदळून दुभाजकाला धडकले होते. त्यामुळे या वाहनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही नुुकसान भरपाई कोणाकडे मागायची? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या समस्येमुळे वाहनधारकांच्या संरक्षणासाठी सदर बजार येथील नागरिकांनी पुढाकार घेवून रस्त्यात पडलेल्या या खड्ड्यात चक्क एक झाड उभे केले. जेणेकरून रात्रीच्या वेळी अपघात होणार नाहीत. रस्त्यात लावलेल्या या झाडामुळे वाहनचालकांना थोडासा का होईना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी संबंधित विभागाने या बाबीकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला
आहे. (प्रतिनिधी)

हजारो लीटर पाणी वाया
गेल्या एक महिन्यापासून या रस्त्यावर जलवाहिनीला गळती लागली आहे. गळतीमुळे रस्ताही उखडला आहे. सदर बजारच्या पूर्व भागात नागरिकांना अजुुनही मुबलक पाणी मिळत नाही. मात्र, या रस्त्यावर दररोज हजारो लीटर पाणी वाया जात आहे. तरीदेखील संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर बजारकडे जाणारा हा मुख्य मार्ग असून या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. त्यामुळे जलवाहिनीची गळती काढने गरजेचे आहे.
- विकास धुमाळ, नागरिक

Web Title: Tree planted in the road for protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.