शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ओसाड माळावर आता ‘मिशन ग्रीन माण’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:31 PM

माण तालुका डोंगर, माळरानाचा. पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर येतील लोकांची भिस्त.

सातारा : वॉटर कप स्पर्धेचा तिसरा टप्पा पार पडल्यानंतर आता माणमधील व मुंबईसह राज्यात कार्यरत असणाऱ्या अधिकाºयांना ग्रीन माण तालुका बनविण्याचं ध्येय लागलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत माळरानासह सीसीटी, शेतीच्या बांधावर एक लाख झाडे लोकसहभागातून लावण्यात येणार आहेत. तर बनगरवाडी (वरकुटे मलवडी) या गावात रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून त्याला ठिबक करण्यात येणार आहे. त्यामुळे हिरव्यागार माण तालुक्याची ही सुरुवात होणार आहे. माण तालुका डोंगर, माळरानाचा. पावसाळ्यात होणाऱ्या पावसावर येतील लोकांची भिस्त. दरवर्षीची पावसाची सरासरी ४५० मिलीमीटर; पण दोन-चार वर्षांतून पावसाचे कमी प्रमाण. मग लोकांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ यायची. जनावरांसाठी छावण्या, चारा डेपो सुरू व्हायचे. निसर्गाच्या या अवकृपेमुळे अनेकजण घरदार सोडून दूर जायचे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातील लोकांनी निसर्गाचा चांगला फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याला त्याच प्रमाणात यशही मिळू लागलं आहे. पाणी फाउंडेशनच्या वतीने सुरू झालेली वॉटर कप स्पर्धा जलसंधारण आणि मनसंधारण करून गेली. त्यामुळे यावर्षी १०६ पैकी ६० च्यावर गावे या स्पर्धेत उतरली. या स्पर्धेतून जलसंधारणाचं मोठं काम झालं आहे. आता फक्त पावसाचीच आस आहे. पाऊस कमी पडला काय आणि मोठा झाला तरी त्याचा फायदा हा नक्कीच होणार आहे. आता वॉटर कप स्पर्धा संपली असून, येथील लोकांना वेध लागले आहे ते वृक्षारोपणाचे. कारण, माण तालुक्यातील अधिकाºयांनी आता हिरवा माण तालुका करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी लोकांना जागृत करून मिशन ठरविण्यात आलं आहे. काही गावांनी वृक्षारोपणासाठी खड्डेही काढले आहेत. फक्त आता पाऊस पडण्याची त्यांना वाट पाहावी लागत आहे. येत्या काही दिवसांत माणमध्ये एक लाखाच्यावर नवीन झाडांची भर पडणार आहे. यामध्ये करंज, लिंब, बाभूळ, जांभळ, खैर, शिसव, वड, पिंपळ, कांचन, पिंपरण आदी झाडांचा समावेश असणार आहे. कारण, माण तालुक्यात कमी पर्जन्यमान असते. ऊनही असल्यामुळे अशा वातावरणात जगणाºया झाडांचीच त्यासाठी निवड करण्यात आली आहे. हे सर्व होणार आहे ते अधिकाºयांच्या पुढाकारातून आणि लोकांच्या सहकार्यातून. मंत्रालयातील उद्योग विभागाचे उपसचिव डॉ. नामदेव भोसले यांच्या प्रयत्नातून कुकुडवाड, आगासवाडी परिसरात किमान एक लाख वृक्षारोपणाचा निर्धार करण्यात आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील विरळी, चिलारवाडी, धामणी आदी गावांतही वृक्षारोपण होणार आहे. 

टॅग्स :environmentवातावरणGreen Planetग्रीन प्लॅनेट